![]() |
संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे गडाच्या पायथ्याला लागूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम धरले आहे. परंतु त्यामुळे तटबंदीला धोका निर्माण होऊ शकतो. हा सर्व्हे बदलून नवीन सर्व्हे करावा व रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी पारगड ग्रामस्थांनी केली आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा पारगड- मोर्ले रस्त्याचे काम रखडले आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,उद्योग मंत्री नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. दरम्यान, या रस्त्याचा कोल्हापूर हद्दीतील सव्हें बांधकाम विभागाकडून केला असून तटबंदीला लागूनच रस्ता होणार आहे. तो बदलावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दोन वर्षांपासून बांधकामविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि किल्ल्याच्या पायथ्याला काम थांबले तर त्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असेल. याची दखल घेऊन तातडीने सव्र्हें बदलावा व नवीन जागेतून रस्ता घ्यावा , अशी मागणी सरपंच संतोष पवार, तटांमुक्त कमिटी माजी अध्यक्ष रघुवीर शेलार, माजी सरपंच विद्याधर बाणे, प्रकाश चिरमुरे, प्रकाश पवार, मनोहर पवार, अर्जून तांबे, धोंडिबा बोर्डे आदीसह ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment