![]() |
वैजनाथ शंकर भोगण पुंडलिक खेमाणा कांबळे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
देवरवाडी (ता. चंदगड) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी वैजनाथ शंकर भोगण यांची तर उपाध्यक्षपदी पुंडलिक खेमाणा कांबळे यांची निवड करण्यात आला. सरपंच गीतांजली सुतार यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आल्या.
प्रारंभी ग्रामसेवक विठ्ठल नाईक यांनी स्वागत करून तंटामुक्त समितीच्या नियम व अटीं समजावून सांगितल्या. त्यावर चर्चा होऊन ही तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये गीतांजली सुतार गोविंद मारुती आडाव, शंकर वैजनाथ भोगण, लक्ष्मण गोविंद आडाव, परसराम नागो आंदोचे, प्रकाश वैजू करडे, व्यंकोजी वैजू जाधव, वैजू टोपण कांबळे,
गावडू भावकू मजुकर, पुंडलिक मष्णू कांबळे, गणपत मारुती भोगण, नागणगौडा वैजनगौडा पाटील, वैशाली विजय सुतार, वनिता महेश जाधव, जोतीबा मारुती आडाव, चंद्रकांत रामचंद्र पाटील, विठ्ठल परशराम नाईक, पोलीस पाटील जयवंत कांबळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.आभार उपसरपंच गोविंद आडाव यांनी मानले.
No comments:
Post a Comment