चंदगड तालुक्यातील ४० पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध,सरपंच पदासाठी ९३ तर सदस्यपदासाठी ६०१ उमेदवार रिंगणात, ६ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2022

चंदगड तालुक्यातील ४० पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध,सरपंच पदासाठी ९३ तर सदस्यपदासाठी ६०१ उमेदवार रिंगणात, ६ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

  


चंदगड / प्रतिनिधी - नंदकुमार ढेरे

चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ४० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर .सरपंच पदासाठी १७० पैकी ७६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.  सदस्यपदासाठी ९२९ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ३१७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ६०१उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले.

नागनवाडी महिपाळगड लकीकट्टे सातवणे, खालसा कोळीद्रे, गुडवळे खालसा, जेलुगडे या ग्रामपंचायतीसाठी अर्ज माघारीनंतर सरपंच पदासाठी एकच अर्ज राहिल्याने या ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. 

निवडणूक लागलेल्या ४० ग्रामपंचायतींच्या १२४ प्रभागातून १७० उमेदवार निवडून देण्यात येणार आहेत. सहा ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा 

निवडणूक लागलेल्या ४० ग्रामपंचायती पैकी नागनवाडी लकीकट्टे सातवणे, खालसा कोळीद्रे, गुडवळे खालसा, जेलुगडे या सह ग्रामपंचायती मध्ये  भारतीय जनता पक्षाचे सरपंच झाल्याने सत्ता स्थापन झाली असल्याची माहीती माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील ,भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस रवि बांदिवडेकर यानी पत्रकार परिषदेत माहीती दिली.

       चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ग्रामपंचायतीची नावे तसेच सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज माघारी नंतर शिल्लक अर्ज संख्या पुढील प्रमाणे अडकूर(३)२६ अलबादेवी(२)१४, आसगोळी,(३)६, कडलगे बु(२)१८, करंजगाव(२)७, कागणी(०)२०, काजिर्णे/ म्हाळुंगे(२)१४, कूदनूर(५)२७, केंचेवाडी(२)१४, कोकरे / आडुरे(४)१५, कोनेवाडी(५)२०,  कोरज (२)१५, कोलिक(२)१४,  कोंळिद्रे खालसा(१)१४,  गवसे (२)१८, गुडवळे खालसा(१) ८, जंगमहट्टी (२)१८, जेलुगडे (१)८, डुक्करवाडी (२)१७, ढेकोळी (२)१३,तडशिनहाळ(३)१४, तेऊरवाडी(४)२०, दुंडगे(२)१४, नागणवाडी(१)७, नागरदळे(३)२०, निटूर,(२)१५ पार्ले(३)१७, महिपाळगड(१)१३, मोटणवाडी,(२)८ म्हाळुगे खालसा(२)१४, राजगोळी खुर्द (४)२६ लक्कीकटे (१)७, विंझणे,(३)१२ शिनोळी बु,(३)१९ शिरगांव(३)२५, सरोळी(२)८, सातवणे (१)९,  हल्लारवाडी,(२)१४, हिडगांव (३)१४,  हेरे (३)१९.

    कागणी येथे सरपंच पदाच्याआरक्षित झालेल्या जागेवर उमेदवार न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले .तहसिल कार्यालयात निवडणूक विभागाचे कामकाज संथ गतीने सुरू होते.अर्ज माघारीनंतर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असू न प्रचाराचा धुरळा उडणार आहे.जेवणावळीना ऊत येऊन हवशा-गवशा मतदारांची मात्र आठ दिवस चंगळ आहे.No comments:

Post a Comment