चंदगड / प्रतिनिधी
मौजे कारवे (ता. चंदगड) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात अज्ञात चोरट्याने घुसून देवीच्या अंगावरील एक लाख ४५ हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरले.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द चंदगड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मौजे कारवे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरट्याने मंदिराचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करून प्रवेश मंदीरातील रुक्मीणी देवीच्या अंगावरील एक लाख ४५ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र लबाडीच्या इरादयाने चोरुन नेले .हि चोरी दिनांक६/१२/२०२२ रोजी रात्री १० वा ते दिनांक ७/१२/२०२२ रोजी पहाटे २.४५ च्या दरम्यान झाली आहे. याबाबतची फिर्याद सरपंच जोतीबा वैजू आपके यानी चंदगड पोलीसात दिली आहे.
No comments:
Post a Comment