किणी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वास्तुशांती,मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2022

किणी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वास्तुशांती,मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळा


कोवाड / प्रतिनिधी

किणी ( ता चंदगड) येथे बुधवार दि १४ ते १७ डिसेंबर अखेर ह. भ.प.डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या अधिपत्याखाली व कळसारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठान श्रीश्रीश्री .ब्र.महर्षी तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर म्हास्वामी (मुक्तिमठ, भुत्रामपहट्टी ) यांचे शुभ हस्ते सोहळा पार पडणार आहे.

   सोमवार दि १२ रोजी सकाळी ९ वाजता मुहूर्तमेढ सोहळा,बुधवार दि १४ रोजी देवदेवतांना आवाहन, याज्ञोपवीत धारण विधी, मूर्ती व कळस मिरवणूक,विणापूजन,विणiसेवा,धान्यiदिवास. गुरुवार दि १५ रोजी गणेशपूजन,मंडप पूजन, कुमारिका पूजन,गोमाता पूजन,पुण्याहवाचन,मातृकापूजन, नांदीश्राद्ध,प्रासाद शुद्धी,वास्तुशांती,पिठदेवतास्थापना,अग्निस्थापना,जलाधीवास,शैयाधीवास.

शुक्रवार दि १६ रोजी उर्वरित यज्ञ,कळसारोहण ,प्राणप्रतिष्ठापना,बलिदान,,पूर्णाहुती,आशीर्वचनव दुपारी २ ते ४ वाजता माहेरवाशिणी महिला मेळावा या कार्यक्रमाचे प्रवक्ते प्रा शिवाजीराव भुकेल आहेत.

शनिवार दि १७ रोजी काला अभंग,गंगापूजन,मुर्ती अभिषेक,माऊली अश्व रिंगण सोहळा पार पडणार आहे, दुपारी १२ नंतर महाप्रसाद होणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीरसाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे विठूमाऊली वारकरी सांप्रदयीक मंडळ व ग्रामस्थ किणी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.





No comments:

Post a Comment