हडलगेचे ग्रामसेवक भरत कापसे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2023

हडलगेचे ग्रामसेवक भरत कापसे यांचे निधन

 

भरत कापसे

कागणी : सी. एल.  वृत्तसेवा

हडलगे डोणेवाडी (ता. गडहिंगलज) ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भरत अण्णासाहेब कापसे (वय 45) यांचे हृदयविकाराने बेळगाव येथे खाजगी रुग्णालयात  सोमवारी दि. 16 रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, नातेवाईक असा परिवार आहे. ते मूळचे शिरढोण (ता. शिरोळ) व सध्या कोवाड, नेसरी रोड येथे वास्तव्याला होते. सध्या ते हडलगे डोणेवाडी येथे कार्यरत असून यापूर्वी किटवाड, कडलगे बुद्रुक, नागरदळे, शिनोळी बुद्रुक या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून काम पाहिले आहे. गत पंधरा वर्षे हुन अधिक काळ त्यांनी चंदगड तालुक्यात कार्यरत होते. एम एस सी ॲग्री पर्यंत त्यांचे शिक्षण झाले असून वर्षभरापूर्वी त्यांची गडहिंगलज तालुक्यात बदली झाली आहे.No comments:

Post a Comment