कालकुंद्री येथील श्री कलमेश्वर 'अखंड नाम सप्ताह' प्रारंभ, शनिवारी सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2023

कालकुंद्री येथील श्री कलमेश्वर 'अखंड नाम सप्ताह' प्रारंभ, शनिवारी सांगता

श्री कलमेश्वर, ग्रामदैवत कालकुंद्री

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

 कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वरचा 'अखंड नाम सप्ताह' शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रारंभ झाला असून सप्ताहाची सांगता शनिवार दि. ४ मार्च रोजी होणार असून या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

      महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या 'अखंड नाम सप्ताह' चे यंदा सलग ९४ वर्ष आहे. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीचा सूर्योदय ते फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत सलग सात दिवस मंदिरात "सांब सदाशिव सांब हर हर सांब सदाशिव सांब" नामस्मरणाचा अखंड गजर चालतो. सप्ताह काळात रोज सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ, ६ ते ८ प्रवचन, रात्री ९ ते १२ कीर्तन, रात्री १२ ते पहाटे ५ जागर भजन तर दुपारी १२ ते सायंकाळी ४ पर्यंत महिला भजनी मंडळाचे भजन चालणार असून ७ दिवस ह भ प महेश बुवा काणे चिपळूण यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

    कीर्तनासाठी हार्मोनियम साथ विवेक बर्वे मुंबई तर चैतन्य गोडबोले दापोली हे मृदंग साथ देणार आहेत. नवसाच्या मुलांचे वजन कार्यक्रम ३ रोजी सकाळी ११ ते सायं. ६ पर्यंत चालणार आहे. ४ मार्च समाप्ती रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत महाप्रसाद तर रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम तसेच हडलगे (ता. गडहिंग्लज) मंडळाच्या सोंगी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी सप्ताह काळातील सर्व कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखंड नाम सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment