तडशिनहाळ येथे २ एप्रिल २०२३ रोजी तालुका मर्यादित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2023

तडशिनहाळ येथे २ एप्रिल २०२३ रोजी तालुका मर्यादित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे हनुमान जयंती निमित्त श्री अष्टविनायक क्रिकेट क्लब पुरस्कृत रविवार दि. २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.वाजता  तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दोन गटात होणार असून मोठा गट - ६ वी ते ८ वी (प्रवेश फी ५० रू) आहे. या गटासाठी ३००१,२००१ ,१००१ रु अशी तर लहान गट - २ री ते ५ वी पर्यत असून प्रवेश फि ३० रूपये असून २५०१ रु,१५०१ रु , ७०१ रु  अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मोठ्यागटासाठी वेळ ७ मिनिटे असून  १) व्यसन सोशल मीडियाचे २) माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा   ३) कोरोना - मी अनुभवलेला लॉकडाऊन ४) पाणी वाचवा, जीवन वाचवा तर लहान गटासाठी वेळ ५ मिनिटे  असून १) मोबाईलच्या युगात, आमचे बालपण ढगात २) मला पडलेले सुंदर स्वप्न, ३) शाळा ऑनलाइनच राहिली तर ......... ४ ) लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज असे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकाने स्पर्धेसाठी ओळखपत्र तसेच जन्मतारीख व इयत्ता याची नोंद असणारे मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पुंडलिक दरेकर ८९७५९३९२२६, आनंद कांबळे व  ९९६०४८९८९३ यांचेशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment