जनवन विकास योजने अंतर्गत चंदगड गावातील लाभार्थ्यांना नगरसेवक दिलीप चंदगडकर यांच्या प्रयत्नातून सिलेंडर अनुदानाचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2023

जनवन विकास योजने अंतर्गत चंदगड गावातील लाभार्थ्यांना नगरसेवक दिलीप चंदगडकर यांच्या प्रयत्नातून सिलेंडर अनुदानाचे वाटप

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

चंदगड ग्रामपंचायत अस्तित्वात असताना २०१८ रोजी डॉ. शामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत चंदगड गावातील लाभार्थ्यांना १ शेगडी १४ सिलेंडर मंजूर असताना त्यातील १ शेगडी २ सिलेंडरचे अनुदान लाभार्थीनी मिळाले होते. उर्वरित १२ सिलेंडरचे अनुदान लाभार्थीना मिळालेले नव्हते. ते नगरसेवक दिलीप चंदगडकर यांच्या प्रयत्नातून ४ सिलेंडरचे अनुदान वाटप आज दिनांक १३/०४/२०२३ रोजी (३,१५,००० रुपये) चेकचे वाटप नगरसेवक दिलीप महादेव चंदगडकर यांच्या हस्ते करण्यात आले. उर्वरीत ०८ सिलेंडरचे अनुदान परत मिळवून देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन असे सर्व लाभार्थ्यांना मा. नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी आश्वस्त केले.

यावेळी नगरसेवक श्री. चंदगडकर यांच्या हस्ते वनक्षेत्रपाल अधिकारी श्री. भोसले व श्री. डेळेकर यांच्या उपस्थितीत चेकचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी मारुती कुंभार, यशवंत डेळेकर, पोपट नाडगौडा, यशवंत कुंभार, किरण जमादार, पप्पू कोदाळकर, सुनील हजगुळकर, समीर चंदगडकर, एकनाथ म्हाडगुत, दत्ता पेडणेकर, बाबू यळवटकर, सोपान म्हाडगुत आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment