कानूर मराठी शाळेचे माजी विद्यार्थी ३४ वर्षानंतर आले एकत्र, शाळेला देणार शैक्षणिक साहित्य भेट - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2023

कानूर मराठी शाळेचे माजी विद्यार्थी ३४ वर्षानंतर आले एकत्र, शाळेला देणार शैक्षणिक साहित्य भेट

 

कानूर मराठी शाळेचे माजी विद्यार्थी ३४ वर्षानंतर आले एकत्र, शाळेला देणार शैक्षणिक साहित्य भेट

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         बचपन ते बच्चेकंपनी आणि करियर ते यशस्वी संसार असा प्रवास करत आपापल्या दुनियेत व्यस्त झालेल्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३४ वर्षांनी पुन्हा भेट झाली. कानूर खुर्द (ता. चंदगड) येथील  श्री. हेरंब केंद्र प्राथमिक शाळेच्या१९८९-९० या सालाच्या माजी विद्यार्थ्यानी स्नेहमेळावा घेतला. गुरुजनांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सातवीच्या जवळपास ३० मुलामुलींनी आवर्जून हजेरी लावली. विद्यार्थांनी ठेवलेली आठवण, व्यक्त केलेली कृतज्ञता आणि सर्वांच्या भेटीतून पुन्हा एकदा सर्वांनी आपला लहानपणीचा काळ जागवला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना  गहिवरून आलं.

          आजच्या या व्यस्त दुनियेत सोशल मीडियाच्या माध्यमातून किमान सर्व विद्यार्थी, जुने मित्र, मैत्रिणी संपर्कात राहतात. त्यातूनच मग एकेमेकांच्या करिअर, काम, संसाराबद्दल माहिती मिळते. त्यातूनच मग जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळतो. अशाच या "जुन्या आठवणी" व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क ठेवला होता. या व्हरचुअल जगातून ऍक्च्युअल जगात भेटण्याचं ठरवून हा विध्यार्थी स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्यता सर्व विद्यार्थींनींची उपस्थिती लक्षणिय  होती.शाळेच्या आठवणी, गप्पा गोष्टी, शाळेला आठवणीची भेट, स्नेहभोजन, फनी गेम्स, मनोरंजन अशा भरगच्च कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.तर जुलै महिन्यात या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या निर्णय घेण्यात आला.यावेळी रमेश झेंडे,

       महादेव गावडे,श्याम कांबळे,संतोष गावडे,बाबू गावडे,प्रकाश शिंदे,विजय गावडे,पांडुरंग मानपकर, अंकुश साखरदांडे ,शिवाजी साखरदांडे,तुकाराम गोंडे, राजाराम गोंडे,नामदेव झेंडे,दिनकर पाटील,रामचंद्र बिर्जे,संजय मानपकर, संजय येरलेकर,महादेव गावडे, (बिजुर) महादेव उपसकर, रामा वरगावकर,वसंत गावडे, शिवाजी गावडे,ज्योती मोहिते, सविता लाड,रेणुका बांदिवडेकर,मंगल गावडे, भारती शिरोडकर,आशा गावडे,शोभा सुतार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. आभार महादेव गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment