मिरवेल ग्रामस्थांचा 'डीपी' प्रश्नी महावितरण समोर उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2023

मिरवेल ग्रामस्थांचा 'डीपी' प्रश्नी महावितरण समोर उपोषणाचा इशारा

 

सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत पारगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले दुर्गम मिरवेल गाव

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     मिरवेल (ता. चंदगड) येथे नवीन इलेक्ट्रिक डीपीची गरज असून त्याबाबतची मागणी ३ जून २०२२ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. तथापि वर्ष पूर्ण होऊनही त्याची पूर्तता महावितरण कडून झालेली नाही. आता या प्रश्नी ग्रामस्थांनी २० जून पासून ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

       मिरवेल, पारगड भागात तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कडून परिसरातील विजेच्या सोयीसाठी ३८ वर्षांपूर्वी लोखंडी खांब व डीपी उभारण्यात आल्या. चाळीस वर्षे होत आल्याने यातील बहुतांशी पोल, डीपी गंजून गेले आहेत. अपवाद वगळता सर्वच पोल मोडकळीस आले आहेत. सध्या मिरवल येथून किल्ले पारगड वर पाणी देण्यासाठी थ्री फेज कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे मिरवेल येथे नवीन डीपी ची नितांत गरज आहे. या कामाची सुरुवात दोन दिवसात न झाल्यास २० जून २०२३ पासून महावितरण चंदगड कार्यालयासमोर आमरण उपोषण उपोषणास बसण्याचा इशारा मिरवेल ग्रामस्थांनी दिला असून यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राजेश पाटील, तहसीलदार चंदगड, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे चंदगड यांना दिले असून निवेदनावर बुधाजी कृष्णा पवार, रामा फटू पवार, विद्याधर शंकर बाणे, मनोहर कृष्णा पवार, संतोष भीमा पवार, भगवान विठ्ठल गवस, आत्माराम बाणे, महादेव पवार, मीनाक्षी पवार, वनिता बाणे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.



No comments:

Post a Comment