चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात सद्भावना दिवस साजरा. यानिमित्त शपथ घेताना |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. राजीव गांधी यांच्या जीवनकार्यची माहिती समुपदेशक विनायक देसाई यांनी उपस्थितांना शपथ दिली. ग्रामीण रुग्णालयामध्ये शासनाच्या वतीने सर्व औषधोपचार मोफत केले जात आहेत. या योजनेची माहितीही दिली. ग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील हासुरे यांनी सद्भावना शपथ दिली. यावेळी औषध निर्माता कृष्णदत्त परीट, अनिल नांदवडेकर यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment