बेळगाव : ध्वजारोहण प्रसंगी अशोक पाटील (कालकुंद्री) व अन्य माजी अधिकारी व कर्मचारी सदस्य. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव येथील माजी नौदल संघटनेमार्फत एक्स सर्विस मॅन शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संघटनेचे अध्यक्ष व निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील (कालकुंद्री) यांच्या हस्ते करण्यात आले.
या ध्वजारोहण समारंभात संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील मनोगत व्यक्त करून विविध लढ्यातील बेळगावातील जवानांच्या वीर पराक्रमांच्या स्मृतीला उजाळा दिला.
उपाध्यक्ष महावीर मजगावकर, सचिव राजीव साळुंखे, जगदीश पाटील, दत्तात्रय जाधव, पीरोजी भोसले यांच्यासह अन्य संचालक मंडळ, बेळगाव तसेच चंदगड तालुक्यातील सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment