ललित तिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2023

ललित तिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे पुणे शहर अध्यक्ष ललित तिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २० ऑगष्ट २०२३ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.

    पुणे शहरातील नामांकित कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यामध्ये असेल. सामाजिक, शैक्षणिक  क्षेत्रामध्ये सदैव समाजासाठी काम करणाऱ्या ललित तिंडे यांच्या कडून नेहमीच समाजासाठी, युवक युवतीसाठी सदैव मदतीचा हात दिला जातो. आताही अशा युवक व युवतीसाठी रोजगार मेळावा ठेवला आहे. यामध्ये Banking job, IT job, KPO JOB, BPO JOB, AUTOMOBILE JOB, MANUFACTURING JOB अशा हजारो नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच माता भगिनींसाठी लोरियल फाउंडेशन मार्फत  ब्युटी पार्लर चे ॲडव्हान्स बेसिक कोर्स मोफत मध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

       कार्यक्रमाचे स्थळ शेठ दगडू राम कटारे हायस्कूल महाराष्ट्र मंडळ शाळा मुकुंद नगर पुणे ३७. तरी या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ललित तिंडे, एस. आर. ग्रुप मित्र परिवार, परवेज शेख महाराष्ट्र नवनिर्माण स्वयंरोजगार सेना पुणे शहरअध्यक्ष यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या ९७६३५४७३७३ फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment