आत्ता तलाठी नेमणुकीच्या गावातच राहणार....! तलाठ्यांनी मुख्यालयी राहावे यासाठी शासनाचा नवा जीआर - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2023

आत्ता तलाठी नेमणुकीच्या गावातच राहणार....! तलाठ्यांनी मुख्यालयी राहावे यासाठी शासनाचा नवा जीआर

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      तलाठी सज्जा मुख्यालयी उपलब्ध राहत नाहीत, फोन उचलत नाहीत अशा अनेक तक्रारी शासनाकडे जनतेने केल्या होत्या. त्याची दखल अखेर राज्य शासनाने घेतली आहे. यापुढे तलाठ्यांनी कार्यालयीन वेळेत सज्जा मुख्यालयात उपस्थित रहावे यासाठी आदेश आता राज्य सरकारने तलाठ्यांना दिलेले आहेत.  याबाबतचा नवीन शासन निर्णय आजच काढण्यात आला आहे. तलाठी मुख्यालय राहणार असल्यामुळे नागरिकांची कामे कोळंबणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.
  महत्त्वाचं म्हणजे तलाठ्यांची कमतरता असल्याने एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचाही चार्ज असतो. तलाठी भरती सुरू असून लवकरच हा भार कमी करू असेही शासनाने म्हटले आहे. सोबतच दरम्यानच्या काळात तलाठ्यांनी मुख्यालयी उपलब्ध राहावं यासाठी काही आदेशही शासनाने दिलेले आहेत.  त्यामुळे आतातरी किमान  तलाठी सज्जा मुख्यालय उपलब्ध राहून गावकऱ्यांचे प्रश्न सोडवतील ही अपेक्षा आहे..
    तलाठ्यांना दिलेले काही महत्वाचे आदेश पुढीलप्रमाणे 
१) तलाठी संवर्गातील नियोजित भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा/बैठका / कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात दिसेल अशा पध्दतीने सूचना फलक आगाऊ वेळेत लावावा. 

(२) तलाठ्यांनी सज्जा कार्यालयीन ठिकाणी उपस्थितीबाबत वेळापत्रक निश्चित करुन सदर
वेळापत्रक संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावावे.  सदर वेळापत्रक संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना देखील पाठविण्यात यावे.

(३) तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल अशा स्वरुपात लावावा. तसेच संबंधित सज्जाचे मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचे नांव दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत.

(४) जनतेस कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
एकंदरीत शासनाच्या या निर्णयाचे शेतकरी व नागरिकांत मोठ्या प्रमाणात स्वागत होण्याची शक्यता आहे.


No comments:

Post a Comment