अडकूर - गणूचीवाडी येथील घटप्रभा नदीवरील पुरामध्ये वाहून गेलेले संरक्षक गार्ड |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
घटप्रभा नदिला आलेल्या पुरामुळे अडकूर - गणूचीवाडी दरम्यान असणाऱ्या घटप्रभा नदिवरील पूलाचे संरक्षक गार्ड वाहून गेले आहेत. त्यामूळे या पूलावरून प्रवास करताना भिती वाटत असल्याने त्वरीत पाटबंधारे विभागाने संरक्षक गार्ड बसविण्याची मागणी गणूची वाडीच्या विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांनी केली आहे.
पंधरा दिवसापूर्वी घटप्रभा नदिला महापूर आला होता. त्यामुळे हा बंधारा आठवडाभर पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. महापूर या बंधार्याला मोठा फटका बसला. बंधार्याच्या पुर्वे कडील बाजूला असलेले संरक्षक खांब पाईप सह वाहून गेले आहेत. या बंधाऱ्या करून इयत्ता ५ पासून पुढीत सर्व इयत्तांची मूले अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजला व अन्यत्र चालत ये - जा करत असतात. येथील गार्डच नसल्याने लहान विद्यार्थी येथून चालत जाताना घाबरत आहेत. विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. यामूळे एखादी मोठी दुर्घटना घडण्या पूर्वी पाटबंधारे विभागाने येथील गार्ड त्चरीत बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment