तावरेवाडी येथे विजेचा धक्का बसून लाकूडतोड मजुराचा जागीच मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2023

तावरेवाडी येथे विजेचा धक्का बसून लाकूडतोड मजुराचा जागीच मृत्यू

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    झाडावर चढून कोयत्याने झाडाच्या फांद्या तोडत असताना हातातील कोयत्याला 33 केव्ही क्षमता असणाऱ्या वीज वाहिनीचा स्पर्श होताच लाकूडतोड मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तावरेवाडी (ता. चंदगड) येथील शिवारात घडली. 

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, वसकोटी (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) येथील श्रीकुमार नागाप्पा चीकराई (वय 35) हे तावरेवाडी (ता. चंदगड) येथे  झाड तोडण्याचे काम करत होते,  मात्र झाड तोडत असताना जवळून गेलेल्या 33 केवी क्षमतेच्या वीज वाहिनी त्यांच्या लक्षात न आल्याने त्या वीज वाहिनी चा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ते चार दिवसापूर्वी लाकूडतोड कामगार म्हणून रुजू झाले आहेत. ते नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आठ पासून सट्टूप्पा पाटील (रा. तावरेवाडी) यांच्या मालकीच्या शिवारात झाड तोडत असताना श्रीकुमारच्या हातातील कोयत्याला 33 केव्ही  होल्टेजच्या वीज वाहिनीला स्पर्श झाला. यामुळे त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करत आहेत.No comments:

Post a Comment