जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सखाराम फदाट यांच्या हस्ते बोरगाव येथे ध्वजारोहन - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2023

जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सखाराम फदाट यांच्या हस्ते बोरगाव येथे ध्वजारोहन

 


जाफराबाद/ जालना : सी. एल. वृत्तसेवा 

      आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा व ७६ वा भारतीय स्वातंत्र्य दिन ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव बु., (ता. जाफराबाद, जि. जालना) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सखाराम तुकाराम फदाट (बापू) व त्यांच्या पत्नी सौ. कासाबाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

बोरगाव बुद्रुक (ता. जाफराबाद) येथे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करताना स्वातंत्र्यसैनिक सखाराम फदाट 

       कार्यक्रमाप्रसंगी शहीद जवान गणेश श्रीराम फदाट, स्वातंत्र्य सैनिक तथा पंस. चे माजी सभापती व जि. प. सदस्य सखाराम फदाट (बापू ) यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुभेदार मेजर तुकाराम सखाराम फदाट, शहीद जवान गणेश फदाट यांचे आई- वडील व वीर पत्नी अंजली फदाट व कुटुंबीय तसेच गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. 

        यावेळी सरपंच लिलाबाई लालसिंग देशमुख, उपसरपंच परमेश्वर फदाट, ग्रामसेवक खरात, माजी सरपंच साहेबराव फदाट, हरिदास जोशी, लालसिंग देशमुख, ज्ञानेश्वर फदाट (माऊली), राजु जाधव, ज्ञानेश्वर मुळे, राजु फदाट, सुनील फदाट, हर्षल पाटील फदाट, दत्ता फदाट, सुभाष फदाट, भास्कर फदाट,ज्ञानेश्वर जाधव, राहुल फदाट, साहेबराव जोशी, अमोल मतकर, परमेश्वर जोशी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देशमुख, जोशी, व साळवे, अंगणवाडी कर्मचारी, युवा मित्रपरिवार,ग्रामस्थ, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment