समाजाच्या दातृत्वातून ज्ञानमंदिरे समृद्ध होतात...! गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार, इब्राहिमपूर शाळेला ग्रामस्थांकडून देणग्या - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2023

समाजाच्या दातृत्वातून ज्ञानमंदिरे समृद्ध होतात...! गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार, इब्राहिमपूर शाळेला ग्रामस्थांकडून देणग्या

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये भौतिक सुविधा परिपूर्ण असणे गरजेचे आहे. तथापि शासनाकडून उपलब्ध निधीतून सर्व पूर्तता होईल असे नाही. त्यासाठी समाजाने दातृत्व दाखवले पाहिजे. सामाजिक देणग्यांतून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण झाल्यास ज्ञान मंदिरे समृद्ध होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. असे प्रतिपादन चंदगड च्या गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांनी केले. त्या केंद्रीय प्राथमिक शाळा इब्राहिमपूर येथे विविध शैक्षणिक साहित्य उद्घाटन व देणगीदारांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ कदम होते.

         स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय कुंभार यांनी केले. शाळेसाठी डॉ दशरथ ओऊळकर, अशोक ओऊळकर, दिपक धुरे, उत्तम पाटील, भाऊ पाटील, गरूडझेप क्रीडा मंडळ, १९९५-९६ दहावी बॅच, या देणगीदारांकडून संगणक, लाऊड स्पीकर संच, हार्मोनियम पेटी, स्पीच बॉक्स आदी शालोपयोगी वस्तू देणगी दाखल मिळाल्या या सर्व देणगीदारांचा सत्कार शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हायस्कूल मुख्याध्यापक वसंत होडगे, सरपंच निळकंठ देसाई, उपसरपंच तुकाराम हरेर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बैनवाड यांनी केले. विजय ढोणुक्षे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment