विद्यार्थी पालक यांच्या समन्वयाचा महाविद्यालयाच्या विकासात मोठा वाटा - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2023

विद्यार्थी पालक यांच्या समन्वयाचा महाविद्यालयाच्या विकासात मोठा वाटा

 


चंदगड / प्रतिनिधी

         "विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाविद्यालयाने नेहमीच पालक सभा व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या विद्यार्थी मेळावे व पालक सभा मधून विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या अडीअडचणी, समस्या यांचे आकलन होते. तसेच काही स्वागतार्ह सूचनाही मिळतात .या सुसंवादामुळेच महाविद्यालयाची वाटचाल प्रगतीपथावर राहिली आहे. पालकांनी ,विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे नेहमी योगदान द्यावे अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. पाटील यांनी व्यक्त केली. 

       ते येथील र.भा .माडखोलकर महाविद्यालयातील पालकांच्या सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी विद्यानंद बाणे, गवस, बेलेकर व पाटील या पालकांनी मनोगते व्यक्त केली तसेच महाविद्यालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा.एस. एन .पाटील यांनी आभार मानले तर ए.डी .कांबळे यांनी सूत्रसंचालन केले .या बैठकीस मोठ्या संख्येने पालक व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment