तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेज मध्ये ग्रीन क्लब अंतर्गत "वन्यजीव सप्ताह" संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2023

तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेज मध्ये ग्रीन क्लब अंतर्गत "वन्यजीव सप्ताह" संपन्न

 


चंदगड  /प्रतिनिधी

       तुर्केवाडी (ता.  चंदगड) येथील महादेवराव बी. एड. कॉलेज मध्थे ग्रीन क्लब अंतर्गत "वन्यजीव सप्ताह" संपन्न झाला. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन "सर्प जनजागृती कार्यशाळा" घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून "वन्यजीव अभ्यासक विकास रघुनाथ माने हे होते. तर अध्यक्ष स्थानी कॉलेजवचे प्रभारी प्राचार्य एन.जे.कांबळे होते.

      यावेळी विकास माने यांनी विषारी सापांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "मारण्याचा प्रयत्न केल्यासच साप स्वरक्षणासाठी चावा घेतो. बरेचसे साप बिनविषारी असतात तर विषारी साप चावल्यानंतर तात्काळ प्राथमिक उपचार करून वैद्यकीय मदत घ्यावी.साप हा शेतकर्यांचा मित्र असून त्यासंदर्भात जनजागृती आवश्यक आहे. साप दिसला की त्याला न मारता सर्पमित्राच्या च्या सहाय्याने त्याला जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात सोडावे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

      तसेच त्यांनी सापाचे प्रकार, सापाबद्दल असणारे गैरसमज, सापांची ओळख, साप चावल्यानंतरचे प्राथमिक उपचार, वैयक्तिक सर्पजन जागृती व प्रशिक्षण या संदर्भात सविस्तर माहिती दिली. प्राचार्य कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतात निसर्गचक्र सुरळीत चालवण्यासाठी वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करणे व त्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विभागप्रमुख प्रा.ग.गो प्रधान पॉलिटेक्निक विभागाचे प्राचार्य एस.पी. गावडे, ग्रीन क्लबचे प्रशिक्षणार्थी समन्वयक मयुरी कांडर यांनी मनोगते व्यक्त केली. 

      या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष महादेव वांद्रे,अधिक्षिका श्रीमती एस आर देशपांडे,प्रा.स्वप्नील सुतार, प्रा.सुरज पाटील, प्रा.सचिन कांबळे,प्रा.सुर्यकांत कांबळे, प्रतिनिधी व ग्रीन क्लब चे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी मोहन चव्हाण यांनी केले तर सुत्रसंचालन विद्या पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रशिक्षणार्थी विठ्ठल नाईक यांनी मानले.


No comments:

Post a Comment