मराठ्यांच्या न्यायासाठी छत्रपती संभाजीराजेंचे सीमोल्लंघन, अंतरवलीला घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2023

मराठ्यांच्या न्यायासाठी छत्रपती संभाजीराजेंचे सीमोल्लंघन, अंतरवलीला घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट

 

संभाजीराजे यांनी घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट

चंदगड / प्रतिनिधी
       काल नवरात्र उत्सवाची सांगता झाली. करवीर छत्रपती घराण्याने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात सोनं लुटले. शाही लवाजमा न्यू पॅलेस येथे परतला. या संपुर्ण सोहळ्याचा क्षीण उतरण्याच्या अगोदरच पहाटे संभाजीराजे यांनी कोल्हापूर सोडले व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळाकडे अंतरवली निघाले.
       साधारणतः पावणे ५०० किलोमीटर चे अंतर होते. ९ दिवस नवरात्र उत्सवाची धामधूम संपवून राजे निघाले. या ९ दिवसांमध्ये छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजापासून दूर करण्याचा डाव काही राजकीय पक्षांनी हाती घेतला होता. संभाजीराजेंना मराठा समाजाचे प्रश्नांवरून सोशल माध्यमातून हेतूपुरस्कर बदनाम केले जात होते. यात पक्षीय कार्यकर्ते अधिक.
     छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा सर्वांना माहितेय. स्वतः आमरण उपोषण केले, सुप्रीम कोर्टात प्रत्येक तारखेला स्वतः हजर राहिले, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी झंझावाती दौरे केले व आत्महत्या केलेल्या मराठा युवकांच्या घरी देखील महाराज अनेक वेळा पोहचले. 
        अगदीच अंतरवली सराटी मध्ये १ सप्टेंबरला अमानुष लाठीचार्ज केला तेव्हा देखील रात्री २ वाजता कोल्हापूर वरून निघून सकाळी ८ वाजता संभाजीराजे अंतरवलीमध्ये मनोज जरांगे पाटील व गावकर्‍यांना धीर द्यायला पोहचले होते. स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली व त्यानंतरही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहिले. मराठा बांधवांनो, राजे आपले आहेत व कायम समाजासाठी लढत राहणार! फक्त धीर खचू देवू नका. आपण हा संघर्षाचा वारसा यापुढे चालवत ठेवू.

No comments:

Post a Comment