चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघाची निवडणूक आम. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्यांदा बिनविरोध झाली. सहकार क्षेत्रात सुस्थितीत असलेल्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी गटांनी अर्ज दाखल केले नव्हते. त्यामुळे आ. राजेश पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा संस्था अबाधित राहिली.
नूतन संचालकांमध्ये आम. राजेश पाटील, अभय देसाई, विठोबा गावडे, परशराम पाटील, पोमाण्णा पाटील, तानाजी गडकरी, जानबा चौगुले, बाळासो घोडके, दयानंद पाटील, अल्लीसो मुल्ला, विजयमाला कोकितकर, महादेव चौकुळकर या विद्यमान संचालकाना तर माजी पं. स. सदस्य अनिल सुरूतकर, गोविंद अमृसकर, अशोक तुपारे, भीमराव चिमणे, आप्पाजी करडे, मनोहर इक्के, लक्ष्मी गुरव या ७ नव्यां चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एस. बी. येजरे यांनी काम पाहीले.
No comments:
Post a Comment