माणगाव येथे आज पासून माणसाने ओझे पळवण्याची जंगी शर्यत - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2023

माणगाव येथे आज पासून माणसाने ओझे पळवण्याची जंगी शर्यत


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      माणकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माणगाव (ता. चंदगड) यांच्यावतीने खास दीपावली निमित्त रविवार दिनांक १२ ते मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सलग  तीन दिवस एका माणसाने ओझे पळवण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 
     एका माणसाने ३५ किलो वजनाचे पोते एका मिनिटात पळवण्याचे आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे बक्षिसे रोख रुपये ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१, मोठा स्टील पिंप, मोठा स्टील हंडा, दहा लिटर स्टील बादली, ७ लिटर कॅन आदी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी हौशी स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment