कालकुंद्री येथे मराठा आरक्षण समर्थनार्थ कॅंडल मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2023

कालकुंद्री येथे मराठा आरक्षण समर्थनार्थ कॅंडल मार्चला उत्स्फूर्त प्रतिसादकालकुंद्री :  सी. एल. वृत्तसेवा
  मराठा आरक्षणा साठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ  कालकुंद्री येथील सकल मराठा समाजातर्फे आयोजित कॅंडल मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने यात सहभाग घेऊन जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. 
    कॅंडल मार्चची सुरवात सरपंच छाया जोशी व उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते  छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. हा मोर्चा देव गल्ली, यादव गल्ली, सुभाष गल्ली, शिवाजी गल्ली सह सर्व गावात फिरून शेवटी छत्रपती शिवाजी चौकात समारोप करण्यात आला. या वेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शेकडो मेणबत्त्यांचा प्रकाश व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी केले. विजय दत्तात्रय कोकितकर यांचे भाषण झाले. मोर्चाचे नियोजन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष शरद जोशी, नरसु पाटील, गावडू उर्फ शिवाजी पाटील, गजाभाऊ पाटील, भाऊ पाटील, अन्वर शेख, भरत पाटील यांच्यासह स्मारक समिती व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment