किल्ले पारगडच्या बालचमुंनी साकारली पारगडचीच प्रतिकृती - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2023

किल्ले पारगडच्या बालचमुंनी साकारली पारगडचीच प्रतिकृती

पारगडच्या प्रतिकृती सोबत आंबेडकर नगर येथील बालचमू

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      दीपावली सुट्टी सुरू झाली की बालचमुंना ओढ लागते ती किल्ले बांधणीची. लहान मुले सर्वत्र छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या रयतेच्या राज्यातील अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती आपल्याबरोबर कल्पनेप्रमाणे साकारत असतात. ऐतिहासिक किल्ले पारगड येथील बालकेही ह्याला अपवाद नाहीत. 

पारगड येथे बालचमूंनी बांधलेल्या पारगड किल्ल्याची प्रतिकृती 

      येथील आंबेडकर नगर मधील लहान मुलांनी आपण राहत असलेल्या किल्ले पारगडची साकारलेली प्रतिकृती गेले काही दिवस पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.  पारगड आंबेडकर नगर मधील शालेय विद्यार्थी व अंगणवाडीत लहान मुलांनी एकत्र येत जिद्दीने ही प्रतिकृती तयार केली. गेला आठवडाभर किल्ला बांधण्यात दीपक, रोहन, समृध्दी, आदित्य, प्रितेश, अनिकेत, वेदिका, पूजा, रामजी, वंशिका, मंदिरा आदी चिमुरडी मुले अग्रेसर होती. त्यांना संदीप कांबळे, साई प्रसाद,  विष्णू. मोहन, राजेश, संजय, योगेश, गोविंद, मनोहर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment