मराठा आरक्षण : जरांगे-पाटील यांच्या शुक्रवारच्या कोल्हापूर येथील सभेला चंदगड मधून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2023

मराठा आरक्षण : जरांगे-पाटील यांच्या शुक्रवारच्या कोल्हापूर येथील सभेला चंदगड मधून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

                       
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे- पाटील यांची शुक्रवार दि. १७ रोजी दुपारी २.०० वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे विराट जाहीर सभा होणार आहे. मराठा समाजासाठी नोकरी, शिक्षण, राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सध्या आरपारची लढाई सुरू आहे. हे आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी मराठा बांधव लाखोंच्या संख्येने या सभेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी चंदगड तालुक्यातील मराठा बांधवांनीही मागे राहता कामा नये. तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने या विराट सभेला सकल मराठा बांधवांनी स्वखर्चाने उपस्थित राहुया, अंतिम टप्प्यात आलेल्या या आरक्षण लढ्याचे सहकारी व साक्षीदार होऊया असे आवाहन सकल मराठा समाज कोवाड विभाग यांच्या वतीने पांडुरंग जाधव आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment