कुदनूर येथे उद्या दि. १५ रोजी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2023

कुदनूर येथे उद्या दि. १५ रोजी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

 

रेकाॅर्ड डान्स

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

       खास दीपावली निमित्त सालाबाद प्रमाणे उद्या दि. १५/११/२०२३ रोजी रात्री ठिक ८.०० वाजता कुदनूर (ता. चंदगड) येथील योद्धा ग्रुप मार्फत भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गुणगौरव समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सरपंच संगीता घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते राजू रेडेकर, उपसरपंच अशोक गवंडी, मारुती आंबेवडकर आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

     स्पर्धा खुला व गाव मर्यादित अशा दोन गटात होणार असून याकरिता भव्य रोख बक्षीसे खुल्या गटासाठी अनुक्रमे रुपये ८००१, ६००१, ४००१, ३००१, २००१, १००१, ५०१. तर गाव मर्यादित स्पर्धेसाठी अनुक्रमे रुपये २५०१, २०००, १५०१, १००१, ५०१ तसेच दोन्ही गटातील सर्व विजेत्यांना संस्कृती संस्कार मोटर ड्राइविंग स्कूल यांचे कडून आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

     यावेळी गुणवंत विद्यार्थी व गत वर्षभरात दूध संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणारे शेतकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यात म्हैस दूध- संभाजी आंबेवाडकर (७९९० लिटर), सौ छाया बामणे (६९३६ लिटर), सौ मुमताज शमणूचे (६३११ लिटर) तर गाय दूध- विनायक आंबेवाडकर (६३७० लिटर), सौ यशोदा गवेकर (४८०६ लिटर), सौ पुजा कोले (३९७१ लिटर) आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

      स्पर्धेत बेळगाव, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, हुक्केरी आदी तालुक्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी 9421298681, 8975032296 या नंबर वर संपर्क करावा. असे आवाहन योद्धा ग्रुपचे अध्यक्ष अविनाश हुद्दार व कार्यकर्त्यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment