माजी सभापती अर्जुन काबंळे यांचा मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यु - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2023

माजी सभापती अर्जुन काबंळे यांचा मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यु

  


चंदगड / प्रतिनिधी

          चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन कल्लाप्पा कांबळे  (वय वर्ष ८५, रा. राजगोळी खुर्द) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यु झाला. अर्जुन कांबळे हे काल गावाच्या शेजारी असलेल्या डोणी नावाच्या शेताकडे गेले होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्या हात, पाय, कान, डोकीला मधमाशांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.या हल्ल्यात काबंळे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोवाड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना बेळगांव येथील के. एल. ई. हॉस्पिटल मध्ये दाखल केले. येथे उपचार सुरू असताना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. १९९९ ते २००२ साली त्यानी चंदगड पंचायत समितीचे सभापती पद भूषविले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

     आमरोळी येथील पत्रकार डाॅ. विजयकुमार कांबळे यांचे ते सासरे होत.

No comments:

Post a Comment