तहसिलदार यांना मागणीचे निवेदन देताना सकल मराठा बांधव.
चंदगड / प्रतिनिधी
मराठा - कुणबी जातीचे पुरावे शोधण्याची मोहिम संपूर्ण महाराष्ट्र राज्यत सुरु आहे. चंदगड येथील जुन्या अभिलेख कक्षात मराठा - कुणबी जातीचे काही जुने पुरावे सापडणार आहेत. ते तात्काळ शोधावेत अशी मागणी चंदगड तालुका सकल मराठा समाजामार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले आहे.
१९६० पूर्वी कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालुका हा बेळगाव प्रांताला (जिल्हयाला) जोडला होता. तेव्हा १९६० पूर्वीचे आम्ही चंदगड तालुक्यातील रहिवाशी कुणबी असल्याचे पुरावे बेळगाव (जिल्हयाला) म्हणजे कर्नाटक सरकारकडे उपलब्ध आहेत. ते पडताळून कुणबी दाखले मिळवून द्यावेत अशी विनंती चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. शंकर मनवाडकर, राजाराम सुकये, नितीन गायचारे, महादेव वांद्रे, विक्रम मुतकेकर, शरद गावडे, नितीन फाटक, नंदकुमार ढेरे, रमेश देसाई आदीसह मराठा बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment