माडखोलकर महाविद्यालयात ३० नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2023

माडखोलकर महाविद्यालयात ३० नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी

      येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात स्वर्गीय र. भा. माडखोलकर यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शुक्रवार दि. ३० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात सकाळी ठीक दहा वाजता सुरू होतील. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे- स्व र. भा. माडखोलकर यांचे शैक्षणिक योगदान,समाज माध्यमांच्या विळख्यात आजची तरुणाई, आरक्षण आणि सामाजिक आक्रोश, शेतकरी जगाचा पोशिंदा- बेदखल होताय का?, मणिपूरची धिंड आणि देशाचा पुरुषप्रधान पिंड असे विषय ठेवण्यात आले असून स्पर्धेसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धकांनी आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र आणणे आवश्यक असून प्रवेश शुल्क ५० रुपये आहे. अधिक माहितीसाठी वक्तृत्व स्पर्धा समिती प्रमुख प्रा. एल. एन. गायकवाड यांच्याशी ९४२१९२६६३४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment