तेऊरवाडीच्या शुभम पाटीलने गाजवले राज्याचे कुस्ती मैदान, दिल्लीला होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2023

तेऊरवाडीच्या शुभम पाटीलने गाजवले राज्याचे कुस्ती मैदान, दिल्लीला होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड

कु. शुभम पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील खेळाडू कु .शुभम जनार्दन पाटील याने पूणे (बारामती) येथे झालेल्या राज्य स्तरीय १९ वर्षीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये अभिनंदनीय यश मिळवले . जिल्हा व विभागीय स्तरावर ७७ किलो वजनी गट गिरको रोमन कुस्ती प्रकारात कु. शुभम ने उज्वल यश संपादन केले. यानंतर बारामती येथे राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी शुभमची निवड झाली आहे. 

कु. शुभमला मार्गदर्शन करणारे वस्ताद पै लक्ष्मण भिंगुडे

   चि. शुभमला श्री राम तालिम मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक पै. लक्ष्मण भिंगुडे, उपाध्यक्ष सुबराव पाटील, पै प्रकाश दळवी, पै. प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर वडील जनार्दन व आई अंजना यांचे प्रोत्साहन मिळाले. या उज्वल यशाबद्दल चि. शुभमचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment