आमदार राजेश पाटील |
तानाजी गडकरी |
चंदगड / प्रतिनिधी
यशवंतनगर (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका शेतकरी, सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी आम. राजेश नरसिंगराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी पांडुरंग गडकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक एस. बी. येझरे होते.
अध्यक्षपदासाठी आमदार पाटील यांचे नाव अभय देसाई यांनी तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी गडकरी यांचे नाव परशुराम पाटील यांनी सुचवले. त्याला अनुक्रमे जानबा चौगुले, अनिल सुरतकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे, एस. एल. पाटील, आमदार राजेश पाटील, अभय देसाई, विठोबा गावडे, परशराम पाटील, पोमाण्णा पाटील, जानबा चौगुले, बाळासो घोडके, दयानंद पाटील, अल्लीसो मुल्ला, विजयमाला कोकितकर, महादेव चौकुळकर, गोविंद अमृसकर, अशोक तुपारे, अनिल सुरुतकर, भिमराव चिमणे, आप्पाजी करडे, लक्ष्मी गुरव हे संचालक उपस्थित होते. आभार व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment