दोडामार्ग-बेळगाव, दोडामार्ग-चंदगड बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल, बस सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2023

दोडामार्ग-बेळगाव, दोडामार्ग-चंदगड बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल, बस सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा


नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी 

        गेल्या काही महिन्यांपासून चंदगड आगाराचा मनमानी कारभार सुरू आहे. चांगले भारमान असलेल्या बसेस बंद करुन प्रवाशांची गैरसोय करणे हे सञ सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सूरू असणारी दोडामार्ग येथून सायंकाळी जाणारी तसेच बेळगाव येथून सकाळी येणारी एकमेव एस टी दोडामार्ग ते बेळगाव दोडामार्ग चंदगड बस गेल्या ५ दिवसांपासून बंद केली आहे. त्यामुळे या बसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था नसल्याने गैरसोय झाली आहे. चंदगड आगार व्यवस्थापक यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. २ दिवसांत बस सूरू केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

      दोडामार्ग ते बेळगाव पुन्हा दोडामार्ग ते चंदगड दोडामार्ग ही बस गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दोडामार्ग येथून सायंकाळी ५.१५ वाजता सुटणारी तसेच बेळगाव येथून सकाळी ७.१५ वाजता दोडामार्ग येथे जाणारी सकाळची एकमेव बस या बसवर गोवा येथे जाणारे प्रवासी दोडामार्ग येथे येतात. दोडामार्ग येथून सकाळी ८ वाजता चंदगड डेपोची पणजी बेळगाव सकाळी साडेनऊ वाजता सावंतवाडी बेळगाव अशा दोन बसेस आहेत. बेळगाव येथे जाणारी शेवटची बस दोडामार्ग बेळगाव आहे. 

     अनेक व्यापारी या बसने बेळगाव येथे जातात शिवाय इतर प्रवासी असतात ही बस सुरळीत सुरू होती प्रवासी भारमान देखील चांगले आहे. असे असताना चंदगड आगार व्यवस्थापक यांनी कुठल्याही प्रकारची कल्पना न देता ही बस अचानक बंद करून गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांचे अतोनात हाल केले आहेत. त्यामुळे अनेक. प्रवाशांना आंबोली घाट मार्गे किंवा गोवा चोर्ला मार्गे जाण्याची नामुष्की आली आहे. चंदगड आगार व्यवस्थापक यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. ही बस दोन दिवसांत सुरू झाली नाही तर चंदगड बस स्थानक येथे आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

     चंदगड आगाराचा मनमानी कारभारामुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांगल्या प्रकारे भारमान असताना त्या बंद करण्याचे कारण स्पष्ट करावे. दिवाळी सण तोंडावर आहे. तेव्हा २ दिवसांत चंदगड दोडामार्ग व बेळगाव दोडामार्ग बस सुरू करावी अशी मागणी केली आहे.

--------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment