भिंतींवर वाढलेल्या झाडाझुडपांत हरवली किटवाडची दोन्ही धरणे....! लक्ष कोण देणार? नागरिकांचा सवाल.... - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2023

भिंतींवर वाढलेल्या झाडाझुडपांत हरवली किटवाडची दोन्ही धरणे....! लक्ष कोण देणार? नागरिकांचा सवाल....

किटवाड येथील दोन्ही धरणांवर बेसुमार वाढलेली झाडे पुढील संकटांना आमंत्रण देत आहेत.

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्याच्या पूर्व टोकास असलेले किटवाड गाव सर्वांच्या मुखात येते ते इथे असलेल्या दोन लघु पाटबंधारे धरणे व धबधब्यांमुळे. या धरणांमुळे कर्यात भागातील कालकुंद्री, कुदनूर, होसुर, किटवाड, कोवाड, दुंडगे अशा अनेक  गावांचा परिसर सुजलाम, सुफलाम झाला असला तरी या धरणांच्या भिंतीवर बेसुमार वाढलेल्या झाडेझुडपांमुळे या  धरणांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तथापि या गंभीर गोष्टीकडे संबंधित विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

       या दोन्ही धरणावरील वाढलेली झाडे वेळीच काढून टाकून पुढील धोका टाळावा अशी मागणी होत आहे. ही झाडे अशीच वाढत राहिली व कालांतराने वाळली तर या वाळलेल्या मुळाच्या बिळांतून पाण्याची गळती होऊन धरणाखालील परिसराला धोका उत्पन्न होऊ शकतो. अशावेळी कोणताही पर्याय चालणार नाही हे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने वेळीच यावर लक्ष देऊन उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment