संदीप देवण |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या चंदगड तालुका प्रमुखपदी संदीप देवण यांची निवड करण्यात आली. शिवसेना वैद्यकीयचे मार्गदर्शक राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख राम राऊत, कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रशांत साळुंखे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख निलेश पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहायत्ता निधीमधून कोणतीही कामे असल्यास 9702282602 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन देवण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment