चंदगड / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बेळगांव वेगुर्ला रोडवर पाटणे फाटा (ता. चंदगड) येचे चक्का जाम आंदोलन केले.
ऊस दरासाठी चालू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन उसाचे दराचे चर्चा फिसकटला मुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या ऊसतोड बंद आंदोलनाला चंदगड तालुक्यातील एकही शेतकरी ऊस दिली नाही. राजू शेट्टीच्या आदेशानुसार आज पाटणेफाटा येथे अकरा वाजता जि. उपाध्यक्ष दिपक पाटील व राज्याध्यक्ष राजेंद्र गड्याण्णावर यांच्या नेतृत्वाखाली ता उपाध्यक्ष जगन्नाथ हुलजी यांनी काही काळ रास्ता रोको केला.
यावेळी बोलताना जगन्नाथ हुलजी म्हणाले, "चंदगड तालुक्यात एकूण तीन साखर कारखाने आहेत. शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातून ऊस आणून गाळत आहेत. त्यासाठी आम्ही आजपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात ऊसाची वाहतूक करू देणार नाही. तसं केल्यास वाहने आडवू आणि चंदगड तालुक्यातील त्रिकूठ साखर कारखानदारांना चालूवर्षीय ३२०० व मागील ४०० रुपये दिल्या शिवाय उसतोड देणार नाही असे स्पष्ट सांगीतले.
या चकाजाम अंदोलनावेळी चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सावंत यांच्या नेतृचाखाली सहायक पोलिस निरीक्षक बारामती व कसेकर तसेच पोलीस कर्मचारी चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकरी संघटनेचे ता. उपाध्यक्ष जगन्नाथ हुलजी सह ४० शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याना ताब्यात घेवून नंतर सोडण्यात आले. अशी माहिती पी. आय सावंत यांनी दिली.
या चक्काजाम आंदोलनावेळी चंदगड तालुक्यातील असंख्य शेतकरी, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment