'महाराष्ट्र श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेत कुदनूरच्या अनिल मोहनगेकर चे दमदार यश - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2023

'महाराष्ट्र श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेत कुदनूरच्या अनिल मोहनगेकर चे दमदार यश

 


कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

    महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व कोल्हापूर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने ६० वी 'महाराष्ट्र श्री राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा- २०२३' नुकतीच संपन्न झाली. कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत कुदनूर, ता. चंदगड येथील अनिल आनंद मोहनगेकर यांने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील ६५ ते ७० वजनी गटात १९ दिग्गज व्यायाम संस्थांच्या शरीर सौष्ठव पटूंचा सहभाग  होता. तरीही कुदनूर सारख्या ग्रामीण  भागातील असूनही अनिलचे हे यश नजरेत भरण्यासारखे आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही त्याने या क्रीडा प्रकारात घेतलेल्या अपार कष्टाने आई- वडील, गाव व तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

       त्याला योद्धा ग्रुप कुदनूरचे अध्यक्ष अविनाश हुद्दार, किरण पाटील, प्रभाकर राऊत, सिद्धार्थ तलवार व ग्रुप चे सहकार्य लाभले. या यशाबद्दल कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम पवार ज्युनिअर कॉलेज तसेच कुदनूर येथील योद्धा ग्रुप, ग्रामपंचायत, सर्व संस्था, तरुण मंडळे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

     यापूर्वी बेळगाव येथे झालेल्या 'बेळगाव श्री - २०२३' स्पर्धेत प्रथम क्रमांक व निपाणी येथे झालेल्या इंटर झोनल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले होते. तिथून त्याची पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड करण्यात आली होती. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. No comments:

Post a Comment