बेरडवाडा शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2023

बेरडवाडा शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

  

चंदगड / प्रतिनिधी
     वरगाव पैकी बेरडवाडा येथील प्राथमिक शाळेला सांगली येथील 
छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छ. शाहू, डॉ. आंबेडकर सामाजिक विचार मंच गव्हर्मेंट कॉलनी  यांच्या वतीने  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
    प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांनी केले. याप्रसंगी विचार मंच चे पदाधिकारी मारुती बालेशगोळ, रविंद्र अशोक कांबळे, प्रज्ञावंत कांबळे, सौ. मनिषा शिवशरण, सौ. सुनिता बालेशगोळ यांनी मनोगत व्यक्त केली. समाजातील दीनदुबळ्यांची सेवा व विकास हे थोरांचे तत्व आत्मसात करणेचे आवाहन केले. याप्रसंगी शालेय कमिटी अध्यक्ष  महादेव नाईक, दाटे ग्रृप ग्रामपंचायत चे उपसरपंच किरण नाईक व मान्यवर उपस्थित होते.आभार विलास सुतार यांनी मानले.

No comments:

Post a Comment