सातवणे येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचा १३ ते १७ डिसेंबर रोजी वास्तुशांती समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2023

सातवणे येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचा १३ ते १७ डिसेंबर रोजी वास्तुशांती समारंभ


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   सातवणे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम १३ ते १७ डिसेंबर २०२३ रोजी होत आहे. ह. भ. प गोविंद सावंत ह. भ .प सुनील गाडे ह. भ. प विष्णू परब यांच्या मार्गदर्शनाखाली व आचार्य वेदशास्त्र संतोष महाजन व सहकारी यांच्या मंत्रोच्चारात परमानंद ज्ञानभास्कर महादेव  वाईकर यांच्या हस्ते होणार आहे. 
     बुधवार १३ रोजी गणेश पूजन, मुहूर्तमेढ, टाळ, मृदंग, विना पूजन. गुरुवार १४ रोजी मानकऱ्यांच्या  हस्ते देव देवतांना आवाहन, शुक्रवार १५ रोजी मूर्ती, कलश मिरवणूक, धान्याधिवास, जलाधिवास, शय्याधिवास. शनिवार १६ रोजी दुपारी वास्तुशांती सोहळा तसेच घंटा पूजन, चौकट पूजन, गणेश पूजन, चौथरा, गाभारा, गोमाता व चव्हाटा पूजन आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, राज्य माथाडी कामगार संघटना अध्यक्ष शिवाजीराव पाटील, दौलतचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. 
     दुपारी होम हवन, नैवेद्य, महाआरती महाप्रसाद होणार आहे. उत्सव काळात दररोज हरिपाठ, कीर्तन आधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील व तालुक्यातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ सातवणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment