माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर पाटील यांचा आज सेवानिवृत्ती समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2023

माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर पाटील यांचा आज सेवानिवृत्ती समारंभ

प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

         'खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री' ता चंदगड संचलित, र भा माडखोलकर महाविद्यालय चंदगडचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे नियत वयोमानानुसार रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहेत. जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील पाटील हे गेली १४ वर्षे या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

   त्यांचे सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयातील गुरुवर्य एस. एन. पाटील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी  १० वाजता शुभेच्छा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खेडूत चे अध्यक्ष ॲड. एस. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. पी. एस. पाटील (प्रभारी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.  यावेळी प्रा. आर. पी. पाटील, ॲड. आर. पी. बांदिवडेकर, के. एस. माळवे, ज. गा. पाटील, अशोक पाटील, गोपाळ बोकडे, एम. एम. तुपारे, एन. डी. कांबळे, डॉ. एस. पी. बांदिवडेकर, सौ. व्ही. आर. बांदिवडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन खेडूत शिक्षण मंडळाच्या सर्व शाखा तसेच प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्ग माडखोलकर महाविद्यालय चंदगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment