स्पर्धेतील खुल्या गटाला झेंडा दाखवून सुरुवात करताना डॉक्टर मनोज तोगले
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजचे माजी प्राचार्य व सर्वोदय शिक्षण संस्था कोवाड चे माजी अध्यक्ष कै डॉ डी व्ही तोगले यांच्या स्मरणार्थ कोवाड (ता. चंदगड) येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल ४०० वर स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेच्या खुल्या गटात माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या अनिकेत अनंत कुट्रे याने तर महिला गटात जयप्रकाश विद्यालय किणीची विद्यार्थिनी वेदांती बाळाराम मनगुतकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन के. एल. इ. हॉस्पिटल बेळगावचे डॉ. मनोज डी. तोगले यांच्या हस्ते चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, आई इन्फ्रा मुंबईचे प्रेसिडेंट नरसू पाटील, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य संजय परमणे, जि. प. सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन. आर. पाटील यांनी स्वागत केले.
ही स्पर्धा खुला गट पुरुष- महिला, १६ वर्षाखालील मुले- मुली व १ ली ते ५ वी मुले- मुली अशा सहा गटात घेण्यात आली. स्पर्धेच्या प्रत्येक गटातील प्रथम सहा विजेत्यांना रोख बक्षीस व पदक देऊन गौरवण्यात आले. गटनिहाय अनुक्रमे सहा विजेते पुढील प्रमाणे- खुला गट पुरुष अनिकेत अनंत कुट्रे (माडखोलकर महा. चंदगड), अभिनय उदय धुरे (माडखोलकर महा. चंदगड), सुरज परमेश्वर भालेकर (भगतसिंग अकॅडमी हलकर्णी), अमित अंकुश धुरी (बेळेभाट), आकाश सुनील गावडे (माडखोलकर महा.), प्रणव पांडुरंग पाटील (व्ही के चव्हाण महाविद्यालय कार्वे). खुला गट महिला वेदांती बाळाराम मनगुतकर (जयप्रकाश विद्यालय किणी), जान्हवी पांडुरंग मोहनगेकर (किणी), निकिता रामू गावडे (यशवंतराव चव्हाण कॉलेज हलकर्णी), वर्षा मेंगाणे (अमरोळी), प्रेरणा पुंडलिक जोशीलकर (जयप्रकाश विद्यालय), हर्षदा श्रीकांत फाटक (हलकर्णी).
१६ वर्षाखालील मुले- मोहन वैजू पाटील, शंतनु शशिकांत मनगुतकर (जयप्रकाश विद्यालय किणी), श्रेयश आनंदा कांबळे (अमरोळी), तुकाराम कोळापाटे (किणी), आदित्य रामू मुतकेकर (कालकुंद्री). १६ वर्षे वयोगट मुली- भूमी किरण बेळगावकर (जयप्रकाश विद्यालय), सुजाता गंगाराम जरळी (राजगोळी बुद्रुक), राधिका कल्लाप्पा बागिलगेकर (कालकुंद्री), स्नेहल दिलीप कदम (कारवे), आरती मारुती अतवाडकर (बी एस पाटील हायस्कूल, होसुर) प्राची लक्ष्मण राजगोळकर (ना सि पाटील हायस्कूल होसुर).
इयत्ता १ ते ५ शिशुगट विजेते मुले अनुक्रमे- दुर्वेश रामदास गिरी (कोवाड), जय पांडुरंग मोहनगेकर (किणी), श्रेयस नारायण पाटील (निट्टूर), गौरव गजानन जोशी (कालकुंद्री), श्रेयश विजय बिर्जे (किणी), संस्कार कृष्णा पाटील (निट्टूर). मुली- भक्ती बाबू पाटील (मलतवाडी), अबोली सुनील चौगुले (विंझणे), नव्या संदीप मोरे (खन्नेटी), रिद्धी संदीप भोगण (कोवाड), श्रेया संदीप तरवाळ (किणी), सिद्धी संदीप भोगण (कोवाड) या धावपटूंनी यश मिळवले सर्व विजेत्या स्पर्धकांना जि प सदस्य हेमंत कोलेकर, सहाय्यक निबंधक सुजय कदम श्रीमती मंगल तोगले सरपंच अनिता भोगण यांच्या हस्ते रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व गटातील सर्व स्पर्धकांना ताम्रगड प्रतिष्ठान च्या वतीने टी-शर्ट देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दयानंद सलाम, संजय कुट्रे, सुभाष बेळगावकर, शशी खराटे, आर टी पाटील, पांडुरंग मोहनगेकर, एन जे बाचुळकर आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत दहा किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले. उपस्थित हजारो क्रीडा शौकिनांना आश्चर्याचा धक्का दिला. याशिवाय ६० वर्षांवरील काही वयस्कर धावपटूनीही हे अंतर पूर्ण केले.
स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर
No comments:
Post a Comment