चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2024

चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

शिवाजीराव पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे नमो चषक भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात  आले असून या स्पर्धेचे नाव नोंदणी 30 जानेवारी या कालावधीपर्यंत पूर्ण करायची आहे. 

       नमो चषक भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या स्पर्धेमध्ये कुस्ती ,फुटबॉल ,खो-खो ,हॉलीबॉल, क्रिकेट, रसिखेच, कॅरम ,बुद्धिबळ, कबड्डी, धावणे 100 मीटर ,400 मीटर तसेच ५ किलोमीटर मॅरेथॉन, ३ किलोमीटर चालणे, १० किलोमीटर सायकल स्पर्धा बॅडमिंटन व संगीत खुर्ची या खेळांचा समावेश असून स्त्री आणि पुरुष यासाठी स्वतंत्र गट आहेत. तर सांस्कृतिक क्रीडा प्रकारांमध्ये चित्रकला, रांगोळी ,गीत गायन, नृत्य स्पर्धा ,एकांकिका ,वकृत्वस्पर्धा या स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा पुरुष आणि महिला एकत्रीत गटात पार पडणार आहेत . 25 फेब्रुवारी पर्यंत या सर्व स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे ,रोख रक्कम आणि चषक स्पर्धकांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती चंदगड तालुका भाजप निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी दिली. या स्पर्धेसाठी वयोमानानुसार गट करण्यात आले असून अधिक माहितीसाठी व स्पर्धेच्या सहभागासाठी ऋषिकेश कुट्रे ८८८८०९०१६४,विष्णू गावडे ९४०४३५९६२८या नंबर वर संपर्क साधावा. 

No comments:

Post a Comment