अपघातग्रस्त दुचाकी |
अडकूर: सी. एल. वृत्तसेवा
नागनवाडी ते नेसरी मार्गावरील पोवाचीवाडी, सावर्डे फाटा नजीक कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन कॉलेज तरुणींसह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज दि. ५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान चाळोबा मंदिर नजीक घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, पोवाचीवाडी येथील दुचाकीस्वार चंद्रकांत गुरव हे दौलत साखर कारखाना कामगार सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या दुचाकी वर र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तनुजा विजय मातवंडकर व अंकिता चंद्रकांत गुरव या कॉलेजला जाण्यासाठी मागे बसल्या होत्या. दुचाकी सावर्डे गावाच्या बाजूने मुख्य रस्त्यावर येऊन चंदगडच्या दिशेने वळण घेत असताना चंदगड हून कोल्हापूर कडे जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसली. दुचाकी मुख्य रस्त्यावर अचानक आल्यामुळे कारचालक मेहताब नाईक यांचा प्रयत्न करूनही गाडीवर ताबा राहिला नाही. त्यामुळे कार रस्त्याच्या बाहेर गेली. यात दुचाकी व कारचे नुकसान झाले. दुचाकी वरील जखमींना आजूबाजूच्या लोकांनी तसेच वाहनधारकांनी तात्काळ रुग्णालयात हलवले.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे अपघात झाला होता. आज त्याची पुनरावृत्ती झाली. अपघातांची ही मालिका टाळण्यासाठी अपघातग्रस्त ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावा व योग्य ते सूचनाफलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment