संत गजानन मार्फत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय क्लस्टर अंतर्गत पेंटन्ट, ट्रेड मार्क, कॉपीराईट यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
महागाव / सी. एल. वृत्तसेवा
संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयास 2023 मध्ये एकूण अकरा पेटंट्सना भारत सरकारकडून मान्यता मिळाली आहे. तत्पूर्वी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर लीड महाविद्यालय क्लस्टर अंतर्गत पेंटन्ट, ट्रेड मार्क, कॉपीराईट यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात आले होते. सन २०२३ मध्ये प्रा. अचला नारायणकर यांच्या 'गारबेज लेवल मॉनिटरींग " बीन व हॅन्ड : गेस्टर रेकगनाइझिंग डिव्हाईस' या दोन प्रकल्पांना तसेच प्रा. अमरसिंह फराक्टे यांच्या 'ट्रॉली व्हिथ लोड मेजरींग सेन्सर' व 'डिसईन्फेक्टींग रोबोटिक डिव्हाईस' या दोन प्रकल्पांना पेटेन्ट्स मिळाले.
प्रा. सौ. पद्मिनी सन्माने यांच्या 'स्मार्ट क्लासरूम मॉनिटरींग डिव्हाईस', प्रा. सचिन मातले यांच्या 'स्मार्ट प्रिटींग ॲन्ड बायडिंग डिव्हाईस' प्रा. रमेश बमनकट्टी यांच्या 'ब्रिक्स पिकिंग अॅन्ड प्लेसिंग मशीन' प्रा. सचिन चौगुले यांच्या 'बांबू स्टीक्स अॅन्ड स्ट्रिप मेकिंग मशीन, प्रा. सिदगोंडा जबडे यांच्या 'होम बायोडिझेल प्रॉडक्शन मशीन', प्रा. शिवलींग स्वामी यांच्या 'स्मार्ट पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट सिस्टीम' डॉ. विरेशकुमार मठद यांच्या 'प्रॉडक्ट डिझाईन अॅन्ड परफॉरमन्स अनालिसीस ऑफ के.सी.एल अॅन्ड के.व्ही.एल. लॅबोरेटरी किट' या प्रकल्पांना भारत सरकार पेटेन्ट कार्यालयामार्फत डिझाईन पेटेन्ट्स नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहेत. तसेच सर्व पेटन्ट्स प्रकाशित झाली आहेत. सदर प्रकल्प अंतिम वर्ष विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्या संयुक्त संकल्पनेतून साकारलेले आहेत.
या पेटेन्ट्स मान्यता मिळविण्यासाठी प्राचार्य डॉ. संजय सावंत, आय.पी.आर. समन्वयक डॉ. अमोल माने व आय.पी.आर. टीम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, सचिव अॅड. बाळासाहेब चव्हाण, अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब चव्हाण यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
संत गजानन मार्फत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय क्लस्टर अंतर्गत पेंटन्ट, ट्रेड मार्क, कॉपीराईट यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
No comments:
Post a Comment