चांगली पिढी घडवण्यात शिक्षकांचा वाटा मोठा : प्रा. सी. एस. गुरव, कोल्हापूर येथे पी बी साळुंखे व दत्ताजीराव माने विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2024

चांगली पिढी घडवण्यात शिक्षकांचा वाटा मोठा : प्रा. सी. एस. गुरव, कोल्हापूर येथे पी बी साळुंखे व दत्ताजीराव माने विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात

 

कोल्हापूर : प्रा. सी. एस. गुरव मार्गदर्शन करताना.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

       विद्यार्थी हा पुस्तकीज्ञानाव्यतिरिक्त अन्य कला गुणातून घडला पाहिजे. यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. समाजामध्ये चांगली पिढी घडवण्यात शिक्षकांचा वाटा मोठा आहे, असे मत नागरदळे (ता. चंदगड) गावचे सुपुत्र व कोल्हापूर, रंकाळा येथील अध्यापक महाविद्यालयाचे आंतरवासिता विभाग प्रमुख प्रा. सी. एस. गुरव यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथीलम. न. पा. पी. बी. साळुंखे व दत्ताजीराव माने विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षिस वितरण समारंभ व विविध गुण दर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी ते  बोलत होते.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी शंकर केशव यादव  होते.  प्रमुख पाहुणे अध्यापक महाविद्यालयचे प्राचार्य एस. के. कांबळे होते. यावेळी  मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन कार्यक्रम सादर केला त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.

No comments:

Post a Comment