चंदगड / प्रतिनिधी
आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अक्षता अयोध्येहून आलेले मंगलकलश रामपूर ग्रामस्थानी दिंडीद्वारे चंदगड येथील रामंदीरातून विधी पूर्वक रामपूरला आणले.शुक्रवारी दि ५ जानेवारी रोजी मंगल कलशाची सवाद्य मिरवणूक काढून मंत्राक्षता व प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमांचे वाटप घरोघरी करण्यात येणार आहे.
चंदगडच्या राम मंदिरात अयोध्येहुन आलेल्या मंगल कलश, प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमा व मंगलाक्षतांचे यांचे पूजन करून सुनिल काणेकर याबाबत सविस्तर माहीती दिली. रामपूर येथील वारकऱ्यांनी दिंडी मिरवणुकीने कलश टाळ मृदुंगाच्या गजरात रवळनाथ मंंदिर,गुुरूवा पेठ, ते संभाजी चौकातून रामपूरला रवाना केला. तालुुक्यातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी मार्फत अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या उद्घाटन व प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आमंत्रण गावोगावी व घरोघरी पोहोचवण्याचे योग्य नियोजन करण्यात आल्याची माहीती विवेक सबनीस यांनी दिली. यावेळी दिडीं वारकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment