चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
न्हावेली (ता. चंदगड) येथील रहिवासी व माजी सरपंच पांडूरंग रामचंद्र गावडे वय ८८ यांचे आज दि ४/१/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, विवाहित तीन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे.
रुक्माणा उर्फ आप्पा पांडूरंग गावडे यांचे ते वडील होत. कै. गावडे दौलत सहकारी साखर कारखान्याचे १५ वर्ष संचालक, वागदादेवी सोसायटीचे ४० वर्ष चेअरमन, महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक, न्हावेलीचे सरपंच, तालुका संघ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. त्यांच्या जाण्याने न्हावेली गाव व परिसर सहकारातील एका तज्ञ व्यक्तीला मुकला आहे.
No comments:
Post a Comment