कोवाड महाविद्यालयाच्या अनिल मोहनगेकर याला शरीरसौष्टव स्पर्धेत रौप्य पदक - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2024

कोवाड महाविद्यालयाच्या अनिल मोहनगेकर याला शरीरसौष्टव स्पर्धेत रौप्य पदक

 

अनिल मोहनगेकर

चंदगड / प्रतिनिधी 

         कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने शरीर सौष्ठव स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. कोल्हापूर येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेत ६५ कीलो वजनी येथील अनिल आनंद मोहनगेकर (बी. ए. भाग ३) या खेळाडूने रौप्य पदक  मिळविले. क्रिडासंचालक प्रा. आर. टी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. अविनाश हुद्दार यांनी मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल अनिल याचे संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment