किल्ले पारगड येथे 23 व 24 रोजी माही यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2024

किल्ले पारगड येथे 23 व 24 रोजी माही यात्रापारगड / सी. एल. वृत्तसेवा 

        अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड, ता चंदगड येथील भगवती भवानी मंदिर ची माही यात्रा शुक्रवार दि. 23 रोजी सुरू होत आहे. सकाळी नविन बांधण्यात आलेल्या तुळशी वृंदावन उद्यापनाने उत्सवाची सुरुवात होईल. 10 वाजता भगवती देवी लघु रुद्राभिषेक, दुपारी महाआरती, रात्री 9 वाजता ह भ प प्रशांत धोंड यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्री 2 वाजता देवीचा गोंधळ आणि महाप्रसाद.  24 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता महादेव मंदिर प्रथम वर्धापन दिन समारंभ व महाप्रसाद, रात्री 10 वाजता महाराष्ट्र लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार 'शान महाराष्ट्राची' हा कार्यक्रम व त्यानंतर श्री भवानी नाट्य मंडळ किल्ले पारगड प्रस्तुत ऐतिहासिक नाटक 'अजिंक्य छत्रपती' असा दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून समस्त देवी भक्तांनी उपस्थीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन पारगड ग्रामस्थ, किल्ले पारगड जनकल्याण संस्था अध्यक्ष कान्होबा माळवे, विलास आडाव, विठ्ठल शिंदे, सुनील मालुसरे, ग्रामपं. सदस्य संदीप कांबळे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment